येवले फाऊंडेशनच्या वतीने सासवड येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांना मास्क व क्रिमरोल वाटप.
सासवड (दि.३ डिसेंबर)
जागतिक अपंग दिनानिमित्त्त प्रहार संघटनेच्या वतीने आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे सुरेखा ताई ढवळे (प्रहार संघटना ,महिला अध्यक्षा) यांच्या वतीने आयोजन करण्यात आला. यावेळी अपंग दिनाचे औचित्य साधून पुण्यातील सुप्रसिद्ध येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशनच्या माध्यमातून पुरंधर तालुक्यांतील दिव्यांग कुटुंबाना मास्क व क्रिमरोल चे वाटप करत कोरोना व्हायरस व दिव्यांगा विषयी जनजागृती करत एक सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पीडीसी बॅंकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे सर , सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे , प्रहार संघटनेच्या महीला अध्यक्षा सुरेखाताई ढवळे ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर , येवले फांऊडेशनचे डायरेक्टर निलेश येवले फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोतीराम येवले , अशोक येवले , गणेश येवले तसेच पुरंधर तालुक्यांतील दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत ताकवले संभाजी महामुनी यांनी केले .

